रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

नेटफ्लिक्सचा स्वस्तात मस्त प्लॅन लाँच

नेटफ्लिक्सने फक्त भारतीय युझर्ससाठी स्वस्तात मस्त प्लॅन लाँच केला आहे.गो माबाइल नावाने १९९ रूपयांचा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना फक्त एसडी क्लालिटीमध्ये व्हिडीओ पाहता येणार आहेत.
 
या प्लॅननुसार ग्राहकांना फक्त 480p वर SD कंटेंटचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना HD, 720p किंवा यापेक्षा जास्त रिझोल्यूशनवर कंटेट दिसणार नाही. हा प्लॅन फक्त एकच व्यक्ती वापरू शकते. या प्लॅनची मुदत एक महिना असून फक्त मोबाइल वापरकर्त्यांसाठीच आहे. Netflix कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात विविध प्लॅनची चाचपणी केली आहे. यामध्ये २५० रूपयांच्या प्लॅनची टेस्टिंग करण्यात येत आहे.
 
भारतामध्ये नेटफ्लिक्सची भरपूर मागणी आहे मात्र यासाठी मोजावे लागणारे पैसे अधिक असल्याने अनेकदा तीन ते चार जण मिळून एक सबस्क्रीप्शन घेताना दिसतात. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांनी नेटफ्लिक्सचे सबक्रिप्शन घ्यावे आणि भारतामधील नेटफ्लिक्स युझर्सची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने नेटफ्लिक्सने दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.