आनंदाची बातमी : नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे 2 सप्टेंबरपासून नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना हा सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिल आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधील नगरपालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी जोर लावून धरली होती.