सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

काय म्हणता, मुकेश अंबानी यांना सलग ११ व्या वर्षी पगार वाढ नाही

उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सलग ११ व्या वर्षी १५ कोटी रुपये वार्षिक वेतन घेण्याचा क्रम राखला आहे. कंपनीच्या २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कंपनीतील सहकाऱ्यांचा पगार २० कोटींच्या घरात गेला आहे. अंबानी यांनी २००८-९ या वर्षापासून आपले वेतन, इतर लाभ, भत्ते आणि कमिशनपोटी १५ कोटी रुपये इतकीच रक्कम कायम ठेवली आहे. तत्पूर्वी त्यांचे वार्षिक वेतन २४ कोटी रुपये इतके होते.
 
मुकेश अंबानी यांचे जवळचे नातेवाईक आणि सहकारी निखील मेसवानी आणि हितल मेसवानी यांच्यासह अन्य पूर्णवेळ संचालकांना मोठी पगारवाढ देण्यात आली आहे. निखील आणि हितल मेसवानी यांचा वार्षिक पगार २० कोटी ५७ लाख झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या वेतनामध्ये चार कोटी ४९ लाख पगार भत्ता, ९ कोटी ५७ लाखांचे कमिशन आणि अन्य सुविधांसाठी २७ लाख रूपयांचा समावेश असल्याचे बैठकीत सांगितले.