बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2019 (16:38 IST)

अंबाबाई देवस्थान समितीच्या उत्पन्नात दीड कोटींची वाढ

साडेतीन शक्‍तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या सन 2018-19 सालातील खजिन्यात वर्षभरात १ कोटी ९ लाख ७५ हजाराच्या दागिन्यांची भर पडली आहे. तर देवस्थान समितीच्या उत्पन्नात १ कोटीं ५६ लाखांची वाढ झाली असल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. 
 
देवीच्या दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी मुंबईचे सरकारी मूल्यांकनकार पुरुषोत्तम काळे यांच्यासह सराफांच्या विशेष समुदायाकडून यावर्षीच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले होते. ही मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात अंबाबाईच्या दागिन्यांत ३ पोती मंगळसूत्र, ३२ लाखाचा ९८० ग्रॅम सोन्याचा किरीट, नवग्रहांचा सोन्याचा हार, मंदिरातील हुंडीत सोन्याचा नथी आणि चांदीच्या जोडव्यांचे दान, तोळ्याचे सोन्याचे बिस्किट तर चांदीच्या वस्तूंचा समावेश झाला आहे.