बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2019 (16:31 IST)

राज ठाकरे यांच्याकडून अभिनेत्री केतकी चितळेच अभिनंदन

"सोशल मिडीयावरील ट्रोल्सना तू ज्याप्रकारे रोखठोक उत्तर दिलंस, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना तू व्यक्त होण्यासाठीची हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन" अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचं अभिनंदन केलं. 
 
केतकी चितळेवर काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावरील ट्रोल्सनी अत्यंत घाणेरड्या शब्दात टीका केली होती. त्या टीकेला केतकीने एका व्हिडिओ पोस्टद्वारे अत्यंत रोखठोक उत्तर दिलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे यांच्यासोबत केतकी चितळे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी आली होती.