1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2019 (10:12 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांचं विहंगम दृष्य गुगल मॅपमधूनही दिसते, व्हिडियो व्हायरल

shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांचं विहंगम दृष्य आकाशातून दिसत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. शिवरायांचं दर्शन गुगल मॅपमधूनही होतेय असे दिसत आहे. हा व्हिडियो लातूर येथील निलंगा तालुक्यातील आहे.शिवजयंतीच्या निमित्ताने महेश निपानीकर यांच्यासह 10 कलाकारांनी ही प्रतिमा साकारली आहे. पाच एकर जमिनीवर 2500 किलो विविध पद्धतीच्या बियाण्यांचा वापर करुन ही प्रतिमा साकारण्यात आली असून, या प्रेमेचे आकाशातूनही  दर्शन करता येत होतं.
 
निलंग्यातील दापता रोड येथील एनडी नाईक यांच्या शेतात ही हरित प्रतिमा साकारण्यात आली. या वर्षी 19 फेब्रुवारीला झालेल्या शिवजयंती उत्सवासाठी दहा दिवस अगोदरच याचे काम सुरु झाले होते. यावेळी गवताचं प्रतिरोपण करुन प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही पूर्ण  प्रतिमा पाहता यावी यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे हा व्हिडियो जोरदार व्हायरल होत आहे सोबत जोरदार शेअर देखील होतो आहे.