सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शिवाजी महाराजांचा जन्म शुद्र जातीत झाल्याचं पायल रोहतगीचं वादग्रस्त विधान

गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. 
 
छत्रपति शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय कुळाचे नसून त्यांच्या जन्म शुद्र जातीत झाल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले गेले आहे. तिने मराठा आरक्षणावरही आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले? असा थेट सवालही तिने केला आहे.
 
तिच्या या पोस्टमुळे टीकेची झोड उठत आहे. यामुळे सोशल मीडियावर नवा वाद सुरु आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
 
पायने पती संग्राम सिंगसोबत फोटो शेअर करत हे वादग्रस्त विधान केले आहे.