मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2019 (09:18 IST)

महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदम सह इतर १५ टोळ्यांतील गुंड जिल्ह्यातून हद्दपार

महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवरायांचा अपमान करणाऱ्या अहमदनगर येथील नगरसेवक श्रीपाद व श्रीकांत शंकर छिंदम (तोफखाना) यांच्यासह जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. छिंदम याने शिवाजी महाराज यांच्या बद्दल असभ्य भाषेत अपमान केला होता. या संभाषणाची ऑडियो टेप व्हायरल झाली होती त्यामुळे नागरिक संतापले होते. याबद्दल त्याला तुरुंगात टाकले होते.शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यानंतर श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. श्रीपाद छिंदमला यापूर्वी नगर महापालिका निवडणुकीच्या वेळीही जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं. जिल्ह्याबाहेर राहूनही श्रीपाद छिंदम जिंकून आला होता. महापालिका सभागृहातही श्रीपाद छिंदमला मारहाण करण्यात आली होती. सोबतच नगर येथील १५ गुंडांच्या टोळ्यांतील गुंडांना जिल्ह्यातून पोलिसांनी हद्दपार केले आहे. 
 
पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी हे आदेश काढले, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, ओंकार भाऊसाहेब कराळे, ऋषिकेश नरेंद्र सिंग परदेशी, मनोज भाऊसाहेब कराळे, रशीद दंडा, चंद्रकांत आनंदा उजगरे, सचिन नंदकुमार पळशीकर, परेश चंद्रकांत खराडे, गणेश महादेव पोटे, बिरजू राजू जाधव, समीर ख्वाजा शेख, टिंग्या किशोर साळवे, विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, गणेश अरुण घोरपडे, आकाश सुरेश पठारे, गणेश सुरेश पठारे,सागर सुरेश पठारे, सरदार मोहम्मद पठाण, अंकुश नामदेव भोरे, गौस आयाज शेख, आली आयाज शेख, मतीन आयाज शेख, बाळू अलीचंद संकलेचा, नदीम नजीर शेख, गिरीश उर्फ भैय्या तवले,सुबोध संजय फुंदे, हबीब रजाक शेख, पवन रमेश भिंगारे, जावेद अल्ताफ शेख, रमेश राजन्ना भिंगारे, समीर हसन कुरेशी, परवेज हाजी कुरेशी, वसीम अब्दुल कुरेशी, असद रौफ कुरेशी,नाविद कुरेशी, भूषण महेंद्र मोरे, योगेश राजेश निकम, सुरज प्रकाश ठाकूर, भागवत दादासाहेब लांडगे, सागर निवृत्ती लुटे, यांना २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.