शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (12:48 IST)

या कारंजात दररोज मिळतात अडीच कोटींची नाणी

नदीमध्ये, सरोवर अथवा पवित्र कुंडात पैसे टाकण्याची पद्धत केवळ भारतातच नाही तर परदेशात अनेक ठिकाणी ही प्रथा आहे. इटलीच्या रोम या प्रसिद्ध पर्यटनस्थळी असलेले ट्रेवी कारंजे याला अपवाद नाही. या कारंजात पैसे टाकले की आपली मनोकामना पूर्ण होते असा लोकांचा विश्र्वास आहे. विशेष म्हणजे मुळातच रोमला भेट देणारे पर्यटक प्रचंड आहेत आणि या कारंजाला ते आवर्जून भेट देतातच. विशेष म्हणजे येणारा प्रत्येक पर्यटक या कारंजात नाणी टाकतो. दिवसअखेर काही वेळ हे कारंजे बंद करून त्यातून नाणी काढली जातात आणि दररोज सरासरी तीन हजार यूरो म्हणजे अडीच कोटी रुपये कितीची नाणी यातून मिळतात. या पैशातून गरीब आणि बेघर लोकांना खाद्यपदार्थ वाटले जातात. वर्षभरात या कारंजातून सरासरी 9 कोटी रुपये मूल्याची नाणी मिळतात. इटालियन आर्क्टिटेक्ट निकोला सल्वो याने या सुंदर कारंजाचे डिझाईन केले असून ते 1732 ते 1762 अशा तीस वर्षात उभारले गेले. हे कारंजे 85 फूट उंच आणि 161 फूट रुंद आहे. रोमला येणारा प्रत्येक माणूस येथे नाणे टाकतो कारणत्यामुळे त्याला पुन्हा रोम भेटीची संधी येते असे मानतात. या कारंजात नाणे टाकताना त्याच्याकडे पाठ करून उभे राहायचे आणि नाणे डोक्यावरून मागे टाकायचे अशी पद्धत आहे. वर्षानुवर्षे ही प्रथा सुरु आहे.