1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

चांदीचे भाव वाढले, सोन्याच्या दरात मात्र घसरण

चांदीच्या भावात एकाच दिवसात तब्बल दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. मागणी नसताना ही वाढ झाल्याने सराफ व्यावसायिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चांदीचे भाव वाढले असले तरी सोन्याच्या भावात मात्र १०० रुपये प्रती तोळ्याने  घसरण झाली आहे.
 
सध्या अनेक  देशांनी चीनकडून साहित्य खरेदी न करण्याची तयारी सुरू केल्याने एका प्रकारे चीन सोबत व्यापार युद्धच सुरू झाले आहे. त्यामुळे ब्राझील, स्पेन, जर्मनी, लंडन, येथून येणाऱ्या चांदीच्या भावावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीचे भाव वधारले. १९ जून रोजी सोन्यासह चांदीच्याही भावत मोठी वाढ झाली होती. त्या दिवशी चांदी ५०० रुपये प्रती किलोने वाढली व ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहोचली होती. त्यानंतर ५ जुलै रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती किलो चांदीचे भाव झाले. ११ जुलै रोजी चांदीने ४० हजार रुपये प्रती किलोचा टप्पा गाठला. तेव्हापासून १७ जुलैचा अपवाद (३९ हजार ५०० रुपये प्रती किलो) चांदी ४० हजार रुपयांवर होती. त्यानंतर २३ जुलै रोजी एकाच दिवसात थेट दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन चांदी ४१ हजार ५००रुपयांवर पोहचली.