शूटिंगसाठी मुहूर्तच मिळेना - सारंग साठ्ये

pandu
Last Modified बुधवार, 2 ऑक्टोबर 2019 (11:36 IST)
सारंग साठ्ये आणि अनुषा नंदा कुमार दिग्दर्शित ‘पांडू’ ही वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. पोलिसांच्या जीवनावर आधारित ही वेबसिरीज सहा भागांची असून, यात पोलिसांच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. या वेबसेरीजच्या प्रमोशनदरम्यान दिग्दर्शक सारंग साठ्ये याने चित्रीकरण करताना घडलेले काही किस्से सांगितले. त्यातलाच एक सारंगला कायम स्मरणात राहील, असा किस्सा म्हणजे शेवटच्या भागाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला किस्सा.

या वेबसिरीजचा शेवटचा भाग 'भारत बंद' या विषयावर आधारित आहे. याबद्दल सारंग सांगतो, "जेव्हा आम्ही या भागाचे चित्रीकरण सुरु केले तेव्हा अनेक अनिश्चित आणि मजेशीर गोष्टी घडत गेल्या तर काही योगायोगही घडले. खरंतर ज्या दिवशी हा भाग चित्रित करायला सुरुवात केली. नेमका त्याच दिवशी खरोखरच 'भारत बंद' होता. त्यामुळे आमचे पहिल्या दिवसाचे शूटिंग रद्द करावे लागले. आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा चित्रीकरणाची तयारी केली, मात्र त्यादिवशी आदल्या दिवशी झालेल्या 'भारत बंद'चा निषेध म्हणून बंद पाळण्यात आला. पुन्हा एकदा चित्रीकरण रद्द करावे लागले.

तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही चित्रीकरणाची तयारी केली तेव्हा आम्हाला शूटिंगसाठी आवश्यक असलेली पोलीस व्हॅनच उपलब्ध
नव्हती. आम्ही बुक केलेली व्हॅन दोन दिवस शूटिंग रद्द झाल्याने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या चित्रीकरणासाठी देण्यात आली होती. पुन्हा एकदा आमचे चित्रीकरण रद्द झाले. सलग तीन दिवस शूटिंग रद्द झाल्याने खरंतर आम्ही खूप त्रस्त झालो होतो. अथक प्रयत्नानंतर अखेर चौथ्या दिवशी ठरलेल्या शेड्युलनुसार आमचे चित्रीकरण पार पडले, तेही उत्तमरित्या आणि अपेक्षित अशा सर्व गोष्टी या भागात आम्हाला दाखवता आल्या. हा प्रसंग खरंतर आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी हसावे की रडावे, अशी आमची स्थिती झाली होती. मात्र या अनुभवातून खूप गोष्टी शिकता आल्या. ''


'पांडू' या वेबसिरीजमध्ये सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका असून या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म
असलेल्या एमएक्स प्लेअर मराठी ओरिजनल्सवर ही
वेबसिरीज विनामूल्य पाहता येईल.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर फोटो शेअर केले
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या ...

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त ...

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर
‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान करणे गायक जान कुमार सानूला चांगलेच महागात ...

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज
FAU-G गेमची प्रतीक्षा संपली आहे. या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये “नेल पॉलिश’ या चित्रपटाचे ...