मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (14:41 IST)

विमान तिकिटांचे पूर्ण पैसे मिळणार; सरकारचे आदेश

government orders
केंद्र सरकारने कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या दुसर्‍या टप्प्यात देशातील विमान आणि अन्य वाहतूक 3 मेपर्यंत बंद राहणार आहे. 
 
लॉकडाउनमुळे ज्यांचे विमान तिकीट रद्द झाले आहे त्यांना विमान कंपन्या तिकीटाचे पैसे परत न देता क्रेडित स्वरुपात देणार होते. मात्र याबद्दल अनेकांनी तक्रार केल्यामे तिकिटांचे पूर्ण पैसे देण्याचे सरकारने आदेश दिले आहेत.
 
ज्या प्रवाशांनी लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीदरम्यान विमानाची तिकिटं आरक्षित केली असतील आणि ज्यांची प्रवासाची तारीख दुसऱ्या लॉकडाउनचा कालावधी म्हणजे १४ एप्रिल ते ३ मे दरम्यान असेल त्यांनाच तिकिटांचे पैसे परत मिळणार आहेत. तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिकिटं आरक्षित केलेल्या प्रवाशांना संपूर्ण पैसे परत मिळणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयानं परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.