शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

कॉरपोरेट क्षेत्राकडून करोना प्रतिबंधासाठी विशेष उपाय जाहीर

भारतातील पेटीएम, विप्रो, टीसीएस, एचसीएल यासारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करोना प्रतिबंधक असा सुरक्षिततेचा उपाय म्हणून एक्शन प्लॅन जाहीर केला आहे. सावधानतेचा उपाय म्हणून पेटीएमने १४ दिवस कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विप्रोनेही आपल्या कर्मचाऱ्यांचे चीन, हॉंग कॉंग आणि मकाउ येथील दौरे रद्द केल्याचे जाहीर केले आहे. कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणून घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणूनच १४ दिवसांनंतरच कर्मचाऱ्यांना ड्युटीवर येण्याचा सल्ला दिला आहे. चीनसारख्या देशात जाऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना हा सल्ला देण्यात आल्याचे विप्रोने जाहीर केले आहे. टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेसनेही आपण सर्व खबरदारी घेत असल्याचे जाहीर केले. तर एचसीएल टेक्नॉलॉजीने सर्व बाधित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुर्णपणे सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे.
 
भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट बॅंक असलेल्या पेटीएमने  गुरगाव नॉयडा येथील कार्यालय आगामी कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी नुकताच इटली दौरा केला होता. त्याठिकाणी पेटीएमच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे दोन्ही कर्मचारी करोनाच्या चाचणीत पॉझिटीव्ह आढळले आहेत. आता संपुर्ण स्वच्छतेनंतरच हे कार्यालय खुले करण्यात येणार आहे.