शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (12:27 IST)

विधानसभा निवडणूक 2019: महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान

विधानसभा निवडणूक 2019: महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान. Vidhansabha election on 21 October in Maharashtra and Haryana
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
 
उमेदवारांना 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. दोन्ही राज्यांचा 24 ऑक्टोबरपर्यंत निकाल तारखेला जाहीर होणार आहे.
 
मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. हरियाणामधील 90 आणि महाराष्ट्रातील 288 जागांसाठी मतदान होणार आहे. त्याबरोबरच देशात 65 ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
 
महाराष्ट्रात 1.8 लाख मतदान यंत्रे आहेत. निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष निरीक्षकांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले.
 
नोव्हेंबर 2019 मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे. गेल्या वेळी 18 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. महाराष्ट्रात एकूण 8. 94 कोटी मतदार आहेत.