शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

युतीचा कोणताही फॉर्मुला ठरलेला नाही

no formula of alliance
सध्या भाजप-शिवसेना युतीचा अजूनही तसाच पेच कायम आहे. दोन्हीकडून युती होणारच हा विश्वास व्यक्त होतो,  मात्र, अद्यापही विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन युतीचं अडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी लोकसभेच्यावेळी झालेल्या फॉर्म्युल्यानुसारच जागावाटप केले जाईल असे वक्तव्य केले, मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा अद्याप कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचं सांगितले आहे.
 
भाजप-शिवसेनेतील अंतिम फॉर्म्युला ठरला की लोकसभेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद  होईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्यात  अमित शाह संबंधित पत्रकार परिषदेला हजर राहणार की नाही याबाबत मात्र, अद्याप स्पष्टता नाही.
 
 ‘लवकरात लवकर’ हाच शब्द युतीची घोषणा होण्यासाठी योग्य आहे असे पाटील यांनी म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, फॉर्म्युलाही  ठरला, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.