गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (10:34 IST)

निवडणुकीत चंद्रकांत पाटलांचा पराभव करुन : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीत पराभव करुन चंद्रकांत पाटलांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तिथे त्यांच्याविरोधात लढणार असल्याचेही शेट्टी म्हणाले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. 
 
स्वाभिमानी सध्या अनेक मुद्द्यांवर आक्रमक झाली आहे. औरंगाबादमध्येही स्वाभिमानी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला उपस्थिती लावत राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, चंद्रकांत पाटलांविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
 
पण, राजू शेट्टींनी आव्हान दिले तरी चंद्रकांत पाटील निवडणूक लढण्याबाबत अजून कोणतीही माहिती नाही. कारण, चंद्रकांत पाटील सध्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. विधान परिषदेचे सदस्यत्व असल्यामुळे ते निवडणूक लढतील का नाही याबाबत शंका आहे. तरीही पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढायला तयार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी म्हटले होते.