शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

अब्दुल सत्तारांच्या हातात भगवा, शिवसेनेत प्रवेश

सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांच्या मनगटावर शिवबंधन बांधले. 
 
या पूर्वी भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली. 
 
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सत्तार पुन्हा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत उद्धव यांनी सत्तार यांना सिल्लोडची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली.