मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

शिवेंद्रराजे भोसले याiना भाजपात जोरदार विरोध, निष्ठावंत भाजप कार्यकर्ते चिडले

vidhansabha election 2019
राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपा पक्षात प्रवेश केलेले शिवेंद्रराजे भोसले  यांच्यामुळे स्थानिक पातळीवर जोरदार  वाद सुरु झाला आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात मागील  पाच वर्षांपासून अहोरात्र काम करत पक्षा सोबत निष्ठा बाळगत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच “शिवेंद्रसिंहराजे हटाव, भाजप बचाव’ ही भूमिका घेत सातारा विधासभा मतदारसंघातील भाजपचे बूथप्रमुख आणि विविध पदाधिकाऱ्यांचा साताऱ्यात मेळावा पार पडला आहे. 
 
शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपाचं तिकीट दिलं तर भाजपाचा झेंडा हातात घेऊन त्यांना पाडण्याचं काम करु, असा इशारा पक्षश्रेष्ठींना भाजपा बूथ प्रमुखांनी दिला. त्यामुळे येत्या विधानसभेचं तिकीट दिपक पवार यांना द्यायचं की शिवेंद्रराजे यांना हा मोठा  पेच प्रसंग निर्माण झालाय. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दिपक पवार यांनी शिवेंद्रराजेंविरोधात आक्रमक भूमिका देखील घेतली आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपात प्रवेश करतोय असं जाहीरपणे सांगत शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहिले जाणार आहे.