बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 जुलै 2019 (09:25 IST)

साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील पक्ष सोडणार

राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या अडचणीत सापडली आहे. त्यांना मुंबईत अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेत जाण्याने मोठी खिंडार पडलं, त्पयात आता मोठा धक्डका लागेल असे चित्र आहे. आता तर राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यात साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदारकीच्या पक्षातील मुलाखतीला दांडी मारल्यामुळे चर्सत आलेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जिल्ह्यात असताना शिवेंद्रराजे यांनी पाठ फिरवल्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे.
 
विशेष  महणजे शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडे विधानसभेचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वर्तुळात संदिग्धता आहे. त्इयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सातार्‍याच्या दौर्‍यावर अजित पवार आले असताना शिवेंद्रराजे या मुलाखतीला अनुपस्थित राहिले त्यामुळे ते नाराज असून ते पक्ष सोडतील असे बोलले जाते आहे. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवले आहेत.