‘मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत. फोडलेली माणसं पक्षात नको‘
प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसला असून, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला आहे. तेव्हा अहिर म्हणाले की आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, मात्र शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु असे ते म्हणाले आहेत. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी यांचे समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सचिन अहिर म्हणाले, “ बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिलं ते शहरांच्या विकासाचं स्वप्न पुढे नेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिकपणे करत आहेत, शहरांची संख्या वाढत असून त्यामुळे नागरिकांचे प्रश्न देखील वाढत आहेत. आता ते प्रश्न सोडवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडे एक स्वप्न असून, त्या स्वप्नात मी त्यांची साथ देईल. आदित्या ठाकरेंकडे राजकारणाचं स्पिरिट आहे. मी त्यांच्यावर याआधी टीका केली होती,
मात्र त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवली. ते त्यांच्या विचारातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करत आहेत.” या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. ‘मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत. मला फोडलेली माणसं पक्षात नको. राजकारण करताना एक वृत्ती हवी असते. आम्हाला माणसं जोडणारी लोकं हवी आहेत. असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.