सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

होर्डिंग्जवर पैसे खर्च करू नका, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

माझ्या वाढदिवसाला होर्डिंग्ज लावू नका. पुष्पगुच्छ आणि होर्डिंग्जवर पैसे खर्च करण्याऐवजी त्या रकमेत सामाजिक उपक्रम राबवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींना केले आहे.
 
येत्या 27 जुलै हा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस देशभरातील शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. हजारो शिवसैनिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी गर्दी करतात. उद्धव ठाकरेही त्यांना प्रत्यक्ष भेटून या शुभेच्छांचा स्वीकार करतात. या वेळी मुंबईसह ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारे शुभेच्छा फलक आणि होर्डिंग्ज लागलेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी असे होर्डिंग्ज नकोत, पर्यावरणाला हानी पोहोचेल असे काही करू नका, असे म्हटले आहे. पुष्पगुच्छ आणि होर्डिंग्जचे पैसे सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केली आहे.