संबंधित माहिती
- आदित्य ठाकरे: शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या 'उमेदवारा'चा आतापर्यंतचा प्रवास
- आयुर्वेदिक कोंबडी शाकाहारी की मांसाहारी, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
- आधी मोर्चा ऐकले नाही तर शिवसेनेच्या भाषेत विमा कंपन्यांना समजाऊन सांगणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३ लाख ३९ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा
- मराठा आरक्षण : आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार
मात्र मुख्यमंत्री कोण ते शिवसेनेने ठरवावं - आदित्य ठाकरे
भाजपा नेते अमित शाह व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सर्व ठरले आहे. त्यावर त्यामुळे मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही, मात्र मुख्यमंत्री कोण ते शिवसेनेने ठरवावं, असे सूचक वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या नियोजित जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस आहे. ते धुळे आणि मालेगाव भागातील नागरिकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधला आहे.
ठाकरे पुढे म्हणाले की, ही जनआशीर्वाद यात्रा असून, मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी नाही. विधानसभेत प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा आपण निवडणुका जिंकणारच आहोत. गेली पाच वर्षे पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आंदोलने केली. रस्त्यावरती उतरलो. सरकारच्या माध्यमातून प्रश्न सोडवले. खासदारांसाठी निवडणुकांमध्ये जे प्रेम मतदारांनी शिवसेनेवर दाखवले आहे म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले असून, शिवसेना कळलेली नाही त्यांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान केले, त्यांची मनं जिंकण्यासाठी ही जनयात्रा काढली आहे.
2012 पासून मी दुष्काळ दौरा करत आहे, पण मागच्या वर्षीचा दुष्काळ हा जरा वेगळा होता. दुष्काळी दौरा करत असताना फोटो काढणे महत्त्वाचे नसते, तर लोकांच्या अडचणी समजून त्या दूर करणे हे महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल, ते ते करत आलेलो आहे आणि यापुढेही करतच राहणार आहोत, हे वचन देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुमच्या मनात काय आहे, तुमच्या समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.
