सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2019 (09:51 IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३ लाख ३९ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी ३ लाख ३९ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. अभिमन्यू पवार यांनी मदतीचे हे धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केले. वाढदिवसानिमित्ताने अभिमन्यू पवार यांनी राबवलेला हा उपक्रम जिल्हा आणि राज्यभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. 
 
अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास येणाऱ्यांनी फुले, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणु नयेत. त्याऐवजी शालेय साहित्य किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश द्यावेत अशी सूचना त्यांनी केली होती. या आवाहनास प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केले. या माध्यमातून ३ लाख, ३९ हजार, २१२ रुपयांचे धनादेश कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जमा केले. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शालेय साहित्यही जमा केले. या साहित्याचे वितरण लवकरच गरजू विद्यार्थ्याना वाटप केले जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा झालेल्या रकमेचे धनादेश अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. मुख्यमंत्र्यानी पवार यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले