शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2019 (09:44 IST)

आर्थिक राजधानीत अजूनही जोरदार पाऊस, राज्यातील सर्व महत्वाचे अपडेट

rain update
मागील दोन दिवस थोड्या प्रमणात विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत आज पुन्हा जोरदार हजेरी लावत जनजीवन पुन्हा विस्कळीत केले आहे. आज पहाटेपासून रिमझिम सुरु झालेल्या पावसाने सकाळी 8 नंतर जोरात पडायला सुरुवात केली होती. जेव्हा कामावर जाण्याच्या वेळीच पावसाच्या मोठमोठ्या सरी बरसू लागल्याने अनेकांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे.
 
तर उपनगरीय भाग असलेले महत्वाची ठिकाणे जसे दादर, शीव, कुर्ला, माटुंगा, लोअर परेल भागात जोरदार पाऊस कोसळला आहे. या जोरदार पावसामुळे सखल भाग असलेल्या दादर, हिंदमाता, परळ यासारख्या भागात पाणी साचले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणत वाहतुक कोंडी झाली होती. या जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात  मंदावली होती तर सकाळी सकाळी विमान वाहतुकीवरही परिणाम झाला. साडेनऊच्या सुमारास विमानाची उड्डाणं रोखण्यात आली.
 
राज्यातील इतर अपडेट :
पुण्यात धरणक्षेत्रात दमदार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, पुण्याच्या ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी
 
सांगली जिल्ह्यातील वारणा धरण, चांदोली परिसरात अतिवृष्टी. वारणा धरण परिसरात मागील 24 तासात दीडशे मिलीमिटर पाऊस. वारणा नदी पातळीत वाढ. वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचे आदेश. मुसळधार पावसामुळे काखे- मांगले आणि कोकरुड- रेठरे पूल पाण्याखाली गेला आहे. शिराळा तालुक्यातुन कोल्हापूर जिल्ह्याशी संपर्क तुटला.
 
रायगड – जिल्ह्यातील महाड आणि इंदापूरमध्ये पूरसदृष्य परीस्थिती, सावित्री आणि काळ नदीच्या पातळीमध्ये वाढ
 
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मंकी हिलजवळ दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत
 
 
सायन पनवेल महामार्गावर अक्षरश: गाड्या वाहून जाण्यासारखी परिस्थिती आहे. खारघर, बेलापूरमध्ये रस्ते पाण्याखाली गेले