रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2019 (09:36 IST)

आधी मोर्चा ऐकले नाही तर शिवसेनेच्या भाषेत विमा कंपन्यांना समजाऊन सांगणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविम्यासाठी विमा कंपन्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. शिवसेना 17 जुलै रोजी विमा कंपन्यांविरोधात महा मोर्चा काढत आहे. सर्व विमा कंपन्यांना इशारा देण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेनेचा इशारा मोर्चा असेल असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. हा शेतकर्‍यांचा मोर्चा नसेल मात्र  हा शेतकर्‍यांसाठी मोर्चा असेल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. जशी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारावर बँकांची नोटीस लागते, तसंच आता कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या दारावर लावण्यात यावी, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केल आहे. आधी आम्ही मोर्चा काढणार आहोत मात्र जर विमा कंपन्यांनी ऐकले नाही तेव्हा मात्र शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देवू असे ठाकरे म्हणाले आहेत.