सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नारायण राणे यांनी निवडणुकीत पराभवाची हॅटट्रिक चुकवायची असेल तर...

शिवसेना नेते, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केसरकर म्हणाले की राणेंनी हॅटट्रिक चुकवायची असेल, तर पुन्हा निवडणूक लढवू नये, असं केसरकर म्हणाले आहेत. 
 
नारायण राणे हे विधानसभेची निवडणूक कोकणातील कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी केली आहे. यावर दीपक केसरकर यांनी राणेंवर टीका केली आहे. 
 
केसरकर म्हणतात, “ नारायण राणे हे दोनवेळा हरले असून, मागील विधानसभेला कुडाळमधून ते पराभूत झाले आहेत. तर पोटनिवडणुकीत वांद्रे मतदारसंघातही त्यांचा पराभव झाला असून, त्यामुळे आता त्यांना हॅटट्रिक चुकवायची असेल, तर पुन्हा राणेंनी निवडणूक लढवू नये” त्यामुळे आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर केसरकर व राणे वाद उफाळून येणार आहे.