सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जुलै 2019 (09:49 IST)

राणेंना अखेर जामिन मंजूर मात्र कोर्टाच्या या आहेत तीन अटी

उपअभियंत्यावर चिखलफेक करत अपमान करणाऱ्या नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना अखेर कोर्टाने  सशर्त जामीन मंजूर केला आहे. ओरोस जिल्हा न्यायालयाने नितेश राणे आणि त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे, कणकवली दिवाणी न्यायालयाने नितेश राणेंसह सर्व आरोपींना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यावरिोधात नितेश राणेंनी ओरोस जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ओरोस न्यायालयाने सर्व आरोपींना वैयक्तिक 20 हजार रुपयांच्या हमीवर जामीन दिला. वकील संग्राम नाईक यांनी नितेश राणे यांची बाजू मांडली. तेव्हा कोर्टाने काही अटी टाकत हा जामीन मंजूर केला आहे. उपभियंत्यास चिखलफेकीमुळे  राणेंवर जोरदार टीका झाली होती तर नारायण राणे यांनी माफी देखील मागितली होती. या सर्व प्रकारामुळे अभियंता वर्ग नाराज झाला असून भिविष्यात राणे यांना याचा मोठा फटका पडणार आहे असे चित्र आहे. 
 
सशर्त जामीनाच्या अटी काय?
 
1) अशा पद्धतीचा गुन्हा पुन्हा करणार नाही
 
2) प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी
 
3) तपास कार्यात सहकार्य करावे