सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जुलै 2019 (09:45 IST)

मुंबईत स्पा नाही ते तर सेक्स रॅकेट

स्पा च्या नावाखाली सुरु असलेल्चाया सेक्स रॅकेटचा मुंबई येथील काशिमीरा पोलिसांनी सर्व प्रकार उघड केला आहे. पोलिसांनी व्यवस्थापक महिलेला अटक केली आहे. तर मालक फरार झाला आहे. ही कारवाई पेणपाड्यातील अजित पॅलेस हॉटेल गल्लीतील डि पॅरेडाईज येथे केली आहे. डि पॅरेडाईज या नावाने चालवण्यात येणाऱ्या स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवतात असे काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांना मिळाली. या मिळालेल्या गुप्त  माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठवला होता. तर स्पामधील व्यवस्थापक चित्रा संजय माने (रा. वसई) वेश्या व्यवसायासाठी चार मुली उपस्थित केल्या होत्या.चित्रा माने याने त्या ग्राहकास एका तरुणीचा व्यवहार साडेतीन हजार रुपयांत केला होता. व्यवहार पक्का झाल्यावर ग्राहकाने बाहेर सापळा रचून बसलेल्या पोलिसांना इशारा केला. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून चित्रा मानेला अटक केली. तर चार तरुणींची सुटका केली. चित्राकडे चौकशी केली असता हे स्पा सेंटर हनिफ शेख याचे असल्याचे सांगितले. या कारवाईनंतर स्पाचा मालक शेख फरार झाला आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.