मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जुलै 2019 (09:43 IST)

पिंपरी चिंचवड येथे १० कर्मचारी वगळता सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आयुकांचा धडाकेबाज निर्णय

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आर.के. पद्यमनाभन हे पहिल्या दिवसापासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या बाबत चर्चेत राहिलेले आहेत. काम न करणाऱ्या, तक्रारदारांना चुकीची वागणूक देणाऱ्या तसेच इतरबाबतीत रस असणाऱ्या अनेकांच्या बदल्या त्या त्या वेळी केल्या आहेत.आज पुन्हा एक धडाकेबाज निर्णय घेत गुन्हे शाखेतील १० कर्मचारी वगळता सर्व कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयात बदल्या केल्या असून गुन्हे शाखेत नवख्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच पोलिस ठाण्यातही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर रहण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी दिले आहेत.
 
गुन्हे शाखेतून बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे  संपत निकम (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), दादाभाऊ पवार (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), तुषार शेटे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), मंहमद नदाफ (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), नितीन बहिरट (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), चेतन मुंढे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), महादेव जावळे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), प्रमोद वेताळ (गुन्हे शाखा युनिट १ ते मुख्यालय), प्रमोद हिरळकर (गुन्हे शाखा युनिट १ ते मुख्यालय), सुनिल चौधरी (गुन्हे शाखा युनिट १ ते मुख्यालय), के. आर आरुटे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), प्रविण दळे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), हजरतअली पठाण (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय)