शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मी शिवसेनेचा देखील मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणूक युती अर्थात भाजपा व शिवसेना सोबतच लढणार असून, त्यासाठी जागावाटप लवकरच पूर्ण  होईल. मात्त्यार निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला संबोधित केले आहे.

यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.  तर तुम्ही आता  लोकसभा निवडणुकीतील विजयानं हुरळून जाऊ नका. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असं देखील ते म्हणाले आहेत. राज्यात शिवसेनेकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणले आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जबर टोला लगावला. मी फक्त भाजपाचा मुख्यमंत्री नाही. तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री नाही. कारण राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केले.

ही विधानसभा निवडणूक युतीतच लढणार आहे.  मित्रपक्षाकडे बोलायची खुमखुमी असलेले अनेक जण आहेत. तशी मंडळी आमच्याकडेदेखील आहेत. मात्र त्यांच्याकडे बोलणारी मंडळी जरा जास्तच आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. सध्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे राज्यातील दौऱ्यावर आहेत.