शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

शिवसेनेने पडणारा नेता घेतला आम्ही मुंबईत नव्याने पक्ष उभा करू – नवाब मलिक

स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, शिवसेनेने पडणारा नेता घेतला, आम्ही मुंबईत नव्याने पक्ष उभा करू आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला. 
 
सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला आणि नेत्यांना दु:ख झाले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो व त्याकडून असा विश्वासघात होत असेल तर ती गोष्ट नक्कीच दु:ख देणारी आहे असेही मलिक म्हणाले. पक्षाने १५ वर्षे मंत्रिपद आणि मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. परंतु मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.