सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जुलै 2019 (09:55 IST)

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचं नाटक सुरू आहे- नवनीत राणा

"शेतकऱ्यांच्या मुद्यावर विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय पक्ष नाटक करत आहेत. राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे" असा आरोप करत नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 
 
जे सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत. त्यामुळे आता बनावट खत कंपन्यांवर कारवाई करण्याकरता केंद्र सरकारने नियंत्रण समिती स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
राज्यातील पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करताना विलंब करत असल्याचा आरोप करत शिवसेनेने मोर्चा काढला. मुंबईतील बीकेसी परिसरातील भारती अक्सा या खाजगी विमा कंपनीच्या मुख्यालयावर हा मोर्चा काढ्ण्यात आला.