बुधवार, 29 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2019 (16:29 IST)

आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती अत्यंत गंभीर

akbaruddin owaisi
एमआयएमचे प्रमुक असदुद्दीने ओवेसी यांचे लहान भाऊ आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 20 दिवसांपासून अकबरुद्दीन ओवेसी लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आणखी काही दिवस अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु राहणार आहेत. 2010 साली अकबरुद्दीन ओवेसी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या शरीरातील आयर्न कंटेट कमी झाला होता.
 
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपला भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनीही ट्विटरवरुन म्हटलं की, “अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.”