शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अंडरवर्ल्ड डॉनच्या भावाला मिळत होती VIP वागणूक, पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

ठाणे- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांची खळबळ उडाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओची गंभीर दखल घेत ठाणे पोलिसांनी चौकशी केली. कासकरला ठाणे कारागृहातून ते रुग्णालयापर्यंत नेणारे पोलीस कर्मचारी यासाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढतपाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
 
खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला इकबाल कासकरला विशेष वागणूक देण्याच्या प्रकरणात निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 
 
सूत्रांप्रमाणे कासकर सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात असून गुरुवारी त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी हा प्रकार घडला. चौकशीदरम्यान रोहिदास पवार आणि त्यांच्या टीमने कासकरला विशेष वागणूक दिली असल्याचं समोर आलं.