बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 7 मार्च 2019 (11:04 IST)

त्वचा भाजल्यावर करा हे घरगुती उपाय ...

गरम पाणी पडल्याने किंवा पेटल्याने वा गरम भांड्याला हात लागल्याने आपण भाजले जातो. भाजल्यामुळे जखमही होतात. कधी हे भाजणं साध असतं तर कधी गंभीर रूप धारण करतं. जखम तीव्र, मध्यम किंवा तीव्र रक्तस्त्रावी असते. म्हणून भाजल्यानंतर ही काळजी घ्या:
 
* जखमेवर बर्फ लावण्याऐवजी भाजल्याबरोबर त्यावर पाण्याची धार सोडा. हे शक्य नसल्यास एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात जखमी भाग बुडवून ठेवा.
 
* तूप, तेल, टूथपेस्ट किंवा कोणताही तरल पदार्थ जखमेवर लावू नये. त्याऐवजी एखादं अॅटीबायोटिक क्रीम लावावं.
 
* भाजलेल्या भागाला कापूस किंवा कापडाने झाकू नये.
 
* जखमेवरील फोड फोडू नये.
 
* जखमेत जंतूसंसर्ग झाला असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही घरगुती उपाय
* कोरफडीच्या गरामध्ये जखम बरी करण्याचे गुणधर्म असतात. जखमेमुळे त्वचेचा दाह होत असेल तर हा गर त्यावर लावावा.
 
* फ्रीजमध्ये ठेवलेली टी बॅग काही काळ जखमेवर दाबून धरा. याने वेदना आणि दाह कमी होईल.
गरमऐवजी गार पाण्याने अंघोळ करा.
 
* व्हिनेगर आणि पाण्याचा मिश्रणात कापूस किंवा कापड बुडवून त्याला जखमेवर काही काळ दाबून ठेवा. नंतर जखमी भाग वाहत्या पाण्याखाली धरा.
 
* हे उपाय साध्या जखमेसाठी असून भाजल्याचे स्वरूप तीव्र असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.