बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (19:05 IST)

मोदींनी आपल्या नावापुढून हटवले 'चौकीदार'

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवले आहे. बहुमताकडे वेग धरल्यानंतर भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले आहे. सोबतच मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून 'चौकीदार' शब्द हटवला आहे. 
 
मोदींनी ट्विट केले की 'आता चौकीदाराची ही प्रेरणा पुढल्या टप्प्यावर नेण्याची वेळ आली आहे, चौकीदाराची ही प्रेरणा जिवंत ठेवून भारताच्या प्रगतीसाठी काम सुरू ठेवा. 'चौकीदार' हे नाव माझ्या ट्विटरवरून जात असलं तरी ते माझं अभिन्न अंग असेल. तुम्हालाही असं करण्याची मी विनंती करतो,' असे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले आहे. 
 
'मैं भी चौकीदार' या शब्दाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धूम केली होती. मी देशाचा चौकीदार असे म्हणणाऱ्या मोदींवर विरोधी पक्षांनी 'चौकीदार चौर हैं' म्हणत टीका केली होती. याचा मोदींनी पुरेपुर फायदा घेतला.