शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

शाह यांची सोलापुरातील सभा उधळून लावू

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सोलापुरातील सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. महाराष्ट्रात दलित सुरक्षित नाहीत, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजानादेश यात्रा घेत फिरत आहेत, असा आरोप भीम आर्मीचा आहे. त्यामुळए केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीने दिला.
 
दोन महिन्यापूर्वी मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहणाऱ्या जालन्याच्या तरुणीवर सामूहिक  बलत्कार झाला. पीडितेवर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अद्यापही सापडले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री हे गृहखाते सांभाळण्यास सक्षम नसल्याचा आरोप करत रविवारी होणारी जाहीर सभा उधळण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे.