मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (09:35 IST)

फारुख अब्दुल्लांना पिस्तूल रोखून सभागृहात आणू शकत नाही : अमित शाह

फारुख अब्दुल्लांना सभागृहात यायचंच नसेल तर मी पिस्तुल रोखून त्यांना आणू शकत नाही, असं विधान गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. कसभेत जम्मू-काश्मीर आणि कलम 370 वर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं.
 
चर्चेदरम्यान फारूख अब्दुल्लांची कमतरता जाणवत आहेत. ते सभागृहात का उपस्थित नाहीत, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना अमित शाह यांनी म्हटलं, "फारुख अब्दुल्ला ना अटकेत आहेत ना ते नजरकैदेत आहेत. ते आपल्या घरात मजेत आहेत."
दरम्यान, कलम 370 रद्द करण्याचा निर्णय लोकशाही विरोधी आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं. 'आम्हाला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझा मुलगा तुरुंगात आहे,' असंही जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारुक अब्दुल्ला यांनी म्हटलं.