गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (09:33 IST)

आम आदमी पार्टी लढवणार ५० जागा, आठ उमेदवार केले जाहीर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख प्रसिद्ध होताच सर्वच पक्षानी यासाठी कंबर कसली आहे. त्यात आता आम आदमी पक्षाने प्रथमच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. आपने आपली पहिली यादी जाहीर केली असून, आपचे महाराष्ट्र सहप्रभारी किशोर मधन महाराष्ट्र संयोजिका प्रीती मेमन मुंबईत पत्रकार परिषद घेऊन 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
 
आपची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 8 उमेदवारांची यादी
 
1. पारोमिता गोस्वामी – ब्रह्मपुरी विधानसभा
2. विठ्ठल गोविंदा – जोगेश्वरी पूर्व
3. आनंद गुरव – करवीर विधानसभा (कोल्हापूर)
4. विशाल वडघुले – नांदगाव (नाशिक)
5. डॉ. अभिजीत मोरे – कोथरूड विधानसभा (पुणे)
6. सिराज खान – चांदोली विधानसभा (मुंबई)
7. दिलीप तावडे – दिंडोशी विधानसभा (मुंबई उपनगर)
8. संदीप सोनवणे – पर्वती विधानसभा (पुणे)