गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (15:33 IST)

भाजपाची यादी तयार २५ आमदारांचे उमेदवारी कापली

या वर्षी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत, सर्व पक्ष आता उमेदवार याद्या निश्चित करत आहेत. सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये 5 उमेदवार जाहीर केल्यानंतर, काँग्रेसनेही 50 उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. या परिस्थितीत सत्ताधारी भाजपने 115 उमेदवारांची यादी तयार केली आहे. भाजपच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे 115 जणांच्या यादीत विद्यमान 25 आमदारांची नावं नाहीत. त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे आता उघड झाले आहे. ज्या आमदारांच्या सर्व्हेमध्ये नकारात्मक कामगिरीचा अहवाल आला, अशा आमदारांना यंदा तिकीट मिळणार नाही. भाजपच्या यादीत 100 विद्यमान आमदारांचा समावेश असून, इतर पक्षातून आलेल्या 15 जणांनाही यामध्ये स्थान दिले आहे. तर लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं होतं. यामध्ये किरीट सोमय्या, सोलापूरचे शरद बनसोड, पुण्याचे अनिल शिरोळे, नगरचे दिलीप गांधी, दिंडोरीचे हरीशचंद्र चव्हाण, लातूरचे सुनील गायकवाड यांचा समावेश होता. आता भाजपा कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या आमदारांची तिकिटे कापणार आहेत हे यादी प्रसिद्ध झाल्यावर उघड होणार आहे.