1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (16:13 IST)

विधानसभा निवडणूक, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

Vidhan Sabha election
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बीडमध्ये बोलताना शरद पवार यांनी बीडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते.
 
शरद पवारांनी यादी जाहीर करताना परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा विजय झाला होता. यामुळे यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात बहिण-भावाचा सामना रंगण्याची शक्यता आहे.
 
याशिवाय गेवराई येथून विजयसिंह पंडित, केज येथून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव येथून प्रकाश सोळंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार यांनी हा पाच नाव जाहीर केली असून आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असं शरद पवारांनी सांगितलं आहे.