विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर नाही : आठवले
राष्ट्रीय समाज पक्षाबरोबरच आता रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षानेही भाजपच्या कमळ चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष आहोत, आम्ही भाजपसोबत निवडणूक लढवित असलो, तरी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार नसल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
पुणे येथील शासकीय विश्रागृहात सामाजिक न्याय व इतर विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते.
10 जागा रिपाइंला मिळाल्या पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली.