शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2019 (09:52 IST)

'मैं ईश्वर की शपथ लेता हूं असे नाही तर मैं सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं अशी घेतली यांनी शपथ

राज्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे त्यांच्या वेगळ्या भन्नाट कवितांसाठी ओळखले जातातच, सोबतच ते नेहमी पेहेरावातून, आविर्भावातून आपलं वेगळेपणही दाखवतात. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात, हजारो मान्यवरांसमोर झालेल्या 'नमो 2.0' च्या शपथविधी सोहळ्यातही त्यांचं हे वेगळेपण पुन्हा दाखवले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आणि शेवटी राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली गेली. 
 
रामदास आठवले वगळता सर्वांनी 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...' असं म्हटलं होते, मात्र आठवलेंनी 'मैं रामदास आठवले सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं...' अशी शपथ घेतली आहे त्यामुळे ते इतरांपेक्षा हटके ठरले आहेत. या सोबतच लोक जनशक्ती पार्टीचे(लोजपा) प्रमुख रामविलास पासवान यांनी सुद्धा 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...' असं म्हटलं नाही. तर त्यांनीही 'मैं रामविलास पासवान सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं...' असं म्हणत शपथ घेतली आहे. तेलंगणातील खासदार जी. किशन रेड्डी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 'भारत माता की जय' असा खणखणीत नारा दिला, तोही लक्षवेधी ठरला आहे.