1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2019 (17:00 IST)

भाजपाने आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटणार नाही

jayant patil
बंगालमध्ये भाजपच हिंसाचार घडवून आणत आहे. पराभव समोर दिसत असल्याने भाजप मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
आपल्या ट्विटमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणालेत की, निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवत आहे, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपाप्रेरित असल्याचे वेगवेगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होते आहे. या सर्व बाबीतुन सत्ताधारी पक्ष काय सिद्ध करत आहे. पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचे व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.