शरद पवार यांचा आज सोलापूर जिल्ह्यात दौरा
राजकारण, निवडणुका या येतात, जातात परंतू आज दुष्काळात सापडलेला बळीराजा उध्दवस्त झाला, तर आख्खा देश संपुष्ठात येईल. यामुळे प्राध्यान्यक्रमाने टंचाईच्या काळात बळीराजाला वाचिवण्यासाठी तसेच बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना दिलासा देण्यासाठी निवडणुका बाजूला ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात मंगळवारी दुष्काळी दौरा अयोजित केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार दि.30 एप्रिल रोजी सकाळी शरद पवार सांगोल्यात येणार आहेत. त्यानंतर सकाळी अजनाळे येथे दुष्काळाने जळालेल्या फळबागा, कोरडी पडलेल्या शेततळ्यांची पाहणी व शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच वाटंबरे येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउददेशीय प्रशिक्षण संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या चारा छावणीस ते भेट देणार आहेत. त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातीमध्ये शिरसी व खुपसींगी या दुष्काळी भागाला भेटी देणार आहेत, असे सळुंखे पाटील यांनी सांगितले.