मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:41 IST)

राजू शेट्टी दोन दिवस प्रचाराला जाणार

Raju Shetty
मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांची गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून मला अविरतपणे काम करण्याची ऊर्जा मिळते. आता लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये महाआघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांत जाणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी  सांगितले.
 
खासदार शेट्टी म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवस कसा जायचा हेच समजत नव्हते. मागील १५ दिवसांत रोज तीन ते चार तासच झोप मिळायची. रोज पहाटे पाच वाजता माझा दिवस सुरु होतो असे सांगितले.