गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती... जाणून घ्या

Maharashtra position in cabinet
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 58 खासदारांनी गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे.  त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल व शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे. तर, राज्यमंत्रिपदी खासदार रावसाहेब दानवे, रामदास आठवले व संजय धोत्रे यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदं आली आहेत. जाणून घ्या कोण्या मंत्र्यांकडे कोणती खाती आली आहेत-
 
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री
पियुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री
प्रकाश जावडेकर – पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री
 
राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री
संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री