शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा फुटणार, मुख्यमंत्री यांची विधानसभेसाठी खेळी

सध्या सत्तधारी भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. एका बाजूला देशातील अनेक नेते भाजपात प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योग्य राजकीय खेळीने आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुद्धा जबर धक्का देणार असे चित्र आहे. कारण विधानसभा निवडणुकी आगोदर अनेक आमदार आता भाजपमध्ये प्रेवेश करणार असे चित्र आहे. 
 
निवडणूक पार पडल्यानंतर आता विरोधी पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. मात्र या सगळ्यात कालच विरोधकांची मुंबईत बैठक पार पडली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भेटीत महाडिकांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असून, त्यांचा लवकरच प्रवेश  वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाडिक यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का बसणार आहे. 
 
अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची भीती याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली होती. भाजपला मिळालेल्या यशामुळे काही आमदार असा निर्णय़ घेऊ शकतात. यामध्ये कमी मताधिक्क्याने निवडून आलेले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकतील, असे देखील त्यांनी म्हटले होते. त्यामुळे कमीतकमी आमदार जातील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते.यावर्षी दिवाळीत विधानसभेच्या निवडणूक होत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार फोडून त्यांना शह देण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश करणारे कॉंग्रेस नेते विखे पाटील सोबत जातांना इतर आमदार ही घेवून जाणार आहेत, असे चित्र आहे. त्यामुळे भाजपला अच्छे दिन तर आघाडीला बुरे दिन सुरु आहेत.