गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2019 (10:06 IST)

भाजपाचे नेते आजही विरोधी पक्षातील आमदारांना फोडण्याची भाषा करतात - जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि दुष्काळावर विस्तृत चर्चा झाली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. लोकसभेच्या सर्व गोष्टी मागे सारून आम्ही विधानसभा निवडणुकीत एकत्रित लढू, असेही पाटील म्हणाले. ईव्हीएम बाबत चर्चा झाली नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आज शंका बोलून दाखवली की अनेक मतदारसंघात आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. याबाबत पुढे आणखी सखोल माहिती घेऊ, असेही पाटील म्हणाले. भाजपाचे नेते आजही विरोधी पक्षातील आमदारांना फोडण्याची भाषा करत आहेत. भाजपाला स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर भरवसा राहिला नाही का? असा खोचक सवाल करत आमचे लोक प्रलोभनांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.