मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2019 (12:19 IST)

मोदींप्रमाणेच आपला पतीही सोडून जाईल, अशी भाजप नेत्यांच्या बायकांना काळजी: मायावती

"पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिलांच्या सुरक्षेसंबंधी वाटणारी काळजी ही नाटकी आहे. मोदींनी राजकीय फायद्यासाठी आपल्या पत्नीचा त्याग केला. महिलांचा सन्मान कसा करायचा हे त्यांना माहीत नाही," या शब्दांत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
 
राजस्थानमधील अलवर इथं दलित महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर मायावतींनी अशोक गहलोत सरकारचा पाठिंबा काढून का घेतला नाही, असा प्रश्न नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारसभेदरम्यान विचारला होता.
 
मोदींच्या याच टीकेला उत्तर देताना मायावतींनी त्यांच्या पत्नीचा संदर्भ देत निशाणा साधला.  
 
पुढे मायावती म्हणाल्या, "मोदींप्रमाणेच आपला नवराही आपल्याला सोडून जाईल का अशी चिंता भाजपमधल्या विवाहित नेत्यांच्या पत्नीला वाटत असते."